उरणमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यशश्रीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले असले तरी आरोपीला शिक्षा झाल्याशिवाय तिला न्याय मिळणार नाही अशा उदविग्न भावना लोकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. दुसरीकडे या हत्येला हिंदू- मुस्लिम द्वेषाचं, लव्ह जिहाद प्रकरण म्हणूनही उचलून धरलं जात आहे.
उरणमधील २२ वर्षीय तरुणी यशश्री शिंदे नेमकी कोण होती? यशश्रीच्या निर्घृण हत्येपाठी कारण काय? आरोपी कोण व त्याला अटक झाली आहे का? पोलिसांनी उरणमधील भयंकर प्रकरणाबाबत काय माहिती दिली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि यशश्री शिंदे हत्येमागील आतापर्यंतचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत.