संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. पहिल्या आठवड्यात सादर करण्यात
आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर दोन्ही सभागृहात चर्चा झाली. दरम्यान काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (२९ जुलै) लोकसभेत जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पातील त्रुटी दाखवत सरकारवर टीका केली, तसंच जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला होता.