“जो पैसा भ्रष्ट्राचाराच्या माध्यमातून गोळा करण्यात आला तोच पैसा पुन्हा भ्रष्ट्राचाऱ्यांना वाटण्यात आला”, असा आरोप करत खासदार संजय राऊतांनी प्रफुल पटेलांचं नाव घेतलं. राज्यसभेत राऊतांची जोरदार फटकेबाजी सुरू होती. मोदींवर त्यांनी सडकून टीका केली. सभापतींनी वारंवार थांबवून देखील संजय राऊतांचं भाषण सुरुच होतं. त्यानंतर त्यांनाचा माईकच थेट बंद करण्यात आला.