नवी मुंबईनंतर उरणमध्ये झालेल्या यशश्री हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढत होत असून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही, अशी टीका होत आहे. याबाबत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील भाष्य केलं आहे. पोलिसांनी आता दहशत दाखवावी. पोलीस काय करू शकतात हे या पुरुषांना कळलं पाहिजे. गेल्या दहा वर्षांपासून शक्ती कायदा बासनात गुंडाळून ठेवला आहे. तो लागू केला जावा, अशी विनंतीही यावेळी शर्मिला ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली.