संसदेच्या अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आहे. या दरम्यान विविध मुद्द्यांवर संसदेत गदारोळ माजलेला पाहायला मिळाला. दिल्लीतील पावसामुळे नव्या संसदभवनाच्या इमारतीला गळती लागल्याचा व्हिडीओ काँग्रेसने एक्स हँडलवर शेअर केला आहे. त्यामुळे आज या मुद्द्यावरूनही विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.