लोकमान्यांच्या प्रेमापोटी पाकिस्तानातील या ठिकाणाचे बदलले नाव
राज्य बदलले, सत्ताधारी बदलले की त्यानंतर अनेकदा ठिकाणांची नावेही बदलली जातात. ब्रिटिश गेल्यानंतर त्यांचा ठसा पुसण्यासाठी आपल्याकडे भारतातही नामांतराची लाट आली, तशीच ती पलीकडे पाकिस्तानातही आली. मात्र असे असतानाही पाकिस्तानातील एका महत्त्वाच्या शहराच्या बरोबर मध्यवर्ती असलेल्या भागाला आजही लोकमान्य टिळकांचे नाव तसेच ठेवण्यात आले आहे. ‘टिळक इन्क्लाईन’चे नाव मात्र बदललेले नाही. १९२० साली लाखोंच्या संख्येने झालेल्या लोकमान्य टिळकांच्या गाजलेल्या सभेनंतर या परिसराला लोकमान्यांच्या गौरवार्थ हे नाव देण्यात आले होते.