गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांबाबत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा पाहायला मिळत आहे. अजित पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये आपण वेश बदलून दिल्लीत गेल्याचं सांगितल्याचं वृत्ता काही माध्यमांमध्ये आल्यानंतर त्यावरून तर्क-वितर्कांना सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीआधी या भेटीगाठी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. यासंदर्भात आज नाशिक दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवारांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.