बिग बाॅस मराठीचं पाचवं पर्व सध्या सुरू आहे. सुरुवातीला खेळात एकत्र असणाऱ्या जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधव यांच्या आता खटके उडाल्याचं पाहायला मिळणार आहे. या भांडणात जान्हवीने आर्याला थेट आव्हान दिलं आहे. तर दुसरीकडे अंकिता वालावलकर हिने आपल्या एका ट्राॅमाबद्दल खुलासा केला आहे.