‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील पहिला आठवडा पूर्ण होत आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात अनेक गोष्टी घडल्या. बिग बॉसच्या या पर्वाचे सूत्रसंचालन करत असलेल्या रितेश देशमुखनं बिग बॉसच्या घरातील काही स्पर्धकांची शाळा घेतली. “ज्याला बोलायचं भान नाही, त्याला इथे स्थान नाही” असं तो निक्की तांबोळीला म्हणाला.