पुणे शहरातील सिंहगड रोडवरील नदी काठच्या भागात असलेल्या एकतानगरी परिसरातील सोसाट्यांमध्ये पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे.त्या पार्श्वभूमीवर अग्निशामक विभागामार्फत या भागातील नागरिकांना सूचना देऊन बाहेर काढण्यात येत आहे. 11 वाजता खडकवासला धरणामधून 35 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.त्याच दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकतानगरी येथे येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत नागरिकांना माहिती देखील दिली. तसेच उपस्थित अधिकारी वर्गाला आवश्यक अशा सूचना देखील दिल्या.