बिग बाॅस मराठीचं पाचवं पर्व सध्या सुरू आहे. रोज नवा ड्रामा घरात पाहायला मिळत आहे. जान्हवी आर्यानंतर आता निक्की आणि अरबाजच्या मैत्रीत फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. अभिजितबरोबर झालेल्या वादानंतर निक्की आणि अरबाजमध्येही खटके उडाले. त्याचबरोबर पंढरीनाथ कांबळे यांनी उच्चारलेल्या एका शब्दामुळे घनश्याम रागवल्याचं पाहायला मिळणार आहे.