महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाडा दौऱ्यावर आहेत. काल सोमवारी (५ ऑगस्ट) धाराशिव येथे मुक्कामी असताना राज ठाकरे यांनी सोलापूर येथे केलेल्या मराठा आरक्षणविषयीच्या वक्तव्यावर मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत ते थांबलेल्या हॉटेलमध्ये जोरदार घोषणाबाजी केली व मराठा आरक्षणाविषयी आपली काय भूमिका आहे हे स्पष्ट करावं अशी मागणी केली. यानंतर मराठा आंदोलक व राज ठाकरे यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली.