काही दिवसांपासून बांगलादेशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अशातच शेख हसीना यांनी तडकाफडकी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिलाय. बांगलादेशमध्ये उफाळलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरील हिंसाचारानंतर शेख हसीना यांनी हेलिकॉप्टरने बांगलादेशातून पलायन केलं. बांगलादेशातून पळ काढणाऱ्या शेख हसीना या वादाच्या भोवऱ्यात कशा अडकल्या? तसेच त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांची राजकीय कारकिर्द या सर्व गोष्टी या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात…