कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. ज्यामुळे विनेशचे काका महावीर फोगट हे भावुक झाले आहेत. “माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही. संपूर्ण देशाला सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मी देशातील जनतेला निराश न होण्यास सांगेन. एक दिवस ती नक्कीच पदक घेऊन येईल. मी तिला पुढच्या ऑलिम्पिकसाठी तयार करेन.”, असं महावीर फोगट म्हणाले.