मुंबईतलं दादर स्टेशन हे कायम गर्दीने गजबजलेलं असतं. सकाळ, दुपार, संध्याकाळ लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची झुंबड या स्थानकात पाहायला मिळते. नेहमीसारखी गर्दी रविवारी ४ ऑगस्टला सुद्धा दादर स्थानकात होती. दादर स्टेशनला फलाट क्रमांक ११ वरून रात्री निघणाऱ्या तुतारी एक्सस्प्रेसने कोकणात जाण्यासाठी स्थानकात गर्दी जमली होती. आणि याच गर्दीत सापडली रक्ताने माखलेला मृतदेह भरलेली बॅग. दोन मूकबधिर व्यक्तींकडे ही बॅग सापडण्यापासून ते चार तासात या हत्येचा उलगडा होईपर्यंत घडलेल्या घटनांचा आढावा आपण आजच्या व्हिडीओमध्ये घेणार आहोत. साइन लँग्वेजमुळे या गुन्ह्याचा शोध लावायला कशी मदत झाली व त्यातून नेमकी कोणती माहिती समोर आली हे सुद्धा आपण तपशीलवार पाहुयात.