पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारामध्ये मराठमोळा नेमबाज स्वप्नील कुसाळेने कांस्यपदक पटकावत इतिहास रचला.कांस्यपदक जिंकल्यानंतर स्वप्नील पुण्यात आला. त्यानं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतलं आणि आरती देखील केली. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा मला अभिमान वाटतो.”, अशी भावना त्यानं यावेळी व्यक्त केली.