केंद्र सरकारने आजत वक्फ कायदा सुधारणा विधेयक सादर केलं. त्यानंतर इंडिया आघाडीकडून या विधेयकावर जोरदार टीका करण्यात येत आहे. लोकसभेत यावरून चर्चा सुरू असताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी विधेयकाला समर्थन देताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील काही मंदिरांचा देखील उल्लेख केला.