आज राज्यसभेत समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी सभापती जगदीप धनखड यांच्या बोलण्याच्या टोनवर प्रश्न उपस्थित केला. जया बच्चन म्हणाल्या की, “मी एक कलाकार आहे. मला देहबोली समजते. मला माफ करा पण तुमचा बोलण्याचा टोन योग्य नाहीये”. जया बच्चन यांचे हे बोलणे ऐकल्यानंतर सभापती जगदीप धनखड हे संतापले.