शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत जागावाटपाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी संजय राऊत म्हणाले, “आमची जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे. जागावाटपावरून पक्षांमध्ये मतभेद नाहीत.” तसेच संजय राऊत यांनी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकारला लोकशाहीच्या मार्गाने सत्तेवरून हटवायचे आहे.”