आनंद दिघे यांच्या आयुष्यावर अधारित धर्मवीर चित्रपटाला शिवसैनिकांनी दोन वर्षांपूर्वी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी ९ ॲागस्ट अशी तारीखही जाहीर करण्यात आली होती. मात्र, राज्यभर कोसळत असलेल्या पावसामुळे लांबणीवर टाकण्यात आल्याचं चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी जाहीर केलं. त्यानुसार आता प्रदर्शनाची नवी तारीख थेट २७ सप्टेंबर अशी ठरविण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुका आणि ‘धर्मवीर-२’चे लांबलेले प्रदर्शन याचा एकमेकांशी संबंध आहे का, अशी चर्चाही यानिमीत्ताने सुरू झाली आहे.