लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, पहिला हप्ता असणार डबल धमाका! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट सध्या समोर येतेय. पण एकीकडे लाडकी बहीण सुखावणार असली तरी त्यामुळे शेतकऱ्यांचा त्रास वाढत असल्याची सुद्धा चर्चा रंगतेय. लाडकी बहीण सारख्या योजनांमुळे राज्यातील शेतकऱ्याचं नुकसान होतंय का, याबाबत नेमकी चर्चा काय तसेच लाडकी बहीण योजनेविषयीचा अपडेट काय हे आज आपण पाहणार आहोत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki bahin yojana) 1 कोटींपेक्षा जास्त अर्ज शासन दरबारी प्राप्त झाले आहेत. यापूर्वीच राज्य सरकारने अर्जाची मुदत 15 ऑगस्ट वरून वाढवून 31 ऑगस्टपर्यंत केल्याने लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी दिली होती. आणि आता आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे, आता रक्षाबंधनाच्या आधी कोणत्या तारखेला लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात येणार हे समजले आहे.