जन सन्मान यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी (९ऑगस्ट) नाशिकमध्ये होते. यावेळी त्यांनी परिधान केलेल्या पेहरावाने सर्वांचंच लक्ष वेधलं. पैठणीचा फेटा आणि जॅकेट अजित पवारांनी घातलं होतं. त्यावरून त्यांनी स्वतःवरच फटकेबाजी करत उपस्थितांमध्ये हशा पिकवला.