मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकून घोषणाबाजी झाल्याचा प्रकार शुक्रवारी बीडमध्ये घडला. या प्रकरणावरून मनसेचे अनेक नेते-पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक शब्दांत टीका केली आहे. तसंच या प्रकरणात शिवसेना ठाकरे गट व शरद पवार गटाचा सहभाग असल्याचे आरोपही होत होते. या सर्व प्रकरणावर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर सविस्तर भाष्य केलं. यावेळी राज ठाकरेंनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांची थेट नावं घेऊन त्यांच्यावर हल्लाबोल केला.