लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजपा यांचा ‘४०० पार’चा नारा प्रत्यक्षात येऊ नये, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही इच्छा होती. भाजपाला अपेक्षित असलेले यश मिळू नये म्हणून संघाकडूनही प्रयत्न झाले. निवडणुकीच्या काळात संघात निरुत्साह होता, असा दावा ‘स्वराज्य भारत’चे संस्थापक व राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी केला. गुरुवारी (८ऑगस्ट) झालेल्या ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते.