शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापू लागलं आहे. या घटनेनंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून यासंदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाष्य आहे. अॅक्शनला रिअॅक्शन असते, ती ठाण्यात बघायला मिळाली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.