माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शनिवारी ठाण्यात आले असता मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर बांगड्या, शेण आणि नारळ फेकले. त्यानंतर ठाण्यात मनसे कार्यकर्ते आणि शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. या प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच चापलं असून खासदार संजय राऊत यांनी आता त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतील अहमदशाह अब्दालीचे ते लोक होते, अशी टीका त्यांनी केली आहे.