समृद्धी महामार्ग हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट. या महामार्गाचे तीन टप्पे पूर्ण झाले असून ते वाहतुकीसाठी खुलेही झाले आहेत. सर्वात कठीण होता चौथा टप्पा, म्हणजेच इगतपुरी ते आमणे हा टप्पा. या महामार्गाचं काम ९९ टक्के पूर्ण झालं आहे. सप्टेंबर अखेर हे काम १०० टक्के पूर्ण होईल अशी माहिती MSRDC ने दिली आहे.