व्हॉट्सअॅप आणि ईमेल हॅक होण्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. सरकारी अधिकाऱ्यांचीही खाती हॅक झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. आता खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक झाल्याचं समोर आलं आहे. दौंड येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत माहिती दिली. या प्रकरणी त्यांनी पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे.