मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली राजकारण केलं जात असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर केली होती. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांना पुण्यात पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की, राज ठाकरे हे आता दिल्लीचं ऐकायला लागले आहेत. मतविभागणी करणाऱ्या अशा नेत्यांना सुपारीबाज कुठेतरी म्हटलं जात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.