राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची शिवस्वराज्य यात्रा रविवारी (११ ऑगस्ट) बारामतीत होती. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी कवितेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव न घेता त्यांना खोचक टोला लगावला. लोकसभा सिर्फ झाकी थी विधानसभा अभी बाकी है, असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा मतदारांना आवाहन केलं आहे.