मनोज जरांगे हे विधानसभा निवडणूक लढवणार, असं म्हटलं जात आहे. याबाबत पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले, “निवडणूक लढवण्याचे निकष काय आहेत? हे मी 29 तारखेला सांगणार आहे. आत्ताच सांगितलं तर खेळ पांगत असतो” 29 तारखेला मनोज जरांगे कोणती घोषणा करणार? याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे. तसेच या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी त्यांच्या तब्येतीबाबत देखील सांगितलं.