स्टॅन्ड अप कॉमेडियन मुन्नवर फारुकीने त्याच्या शोमध्ये कोकणी माणसांबद्दल केलेल्या एका विधानामुळे त्याच्या सोशल मीडियावर टीकेचा भडीमार होत होता. त्यानंतर मनसे आणि भाजपाने हिसका दाखवल्यानंतर मुन्नवरने आता माफी मागितली आहे. सॉरी माझ्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या मी त्यांची माफी मागतो. इंटरनेटवर जोक व्हायरल झाला आहे. मात्र मी तुम्हा सगळ्यांची मनापासून माफी मागतो, असा व्हिडीओे मेसेज मुन्नवरने आपल्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट केला आहे.