आगामी विधानसभेसाठी महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? याबाबत सध्या खलबतं सुरु आहेत. अशातच आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत सूचक भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला. तर काँग्रेसमध्ये जर वेगळा चेहरा असेल तर नाना पटोलेंनी सांगावं, असंही ते खोचकपणे म्हणाले.