एका आंब्याच्या झाडावरून होणारा वाद आपण नेहमीच ऐकतो. किमान महाराष्ट्रात तरी एका झाडाच्या मालकी हक्कावरून भाऊबंदकीत होणाऱ्या वादाची चर्चा नेहमीच होत असते. परंतु चक्क एका आंब्याच्या फळावरून सुरु झालेल्या आणि त्यानंतर ४० वर्षे चाललेल्या खटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.