राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? असा प्रश्न पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मुख्यमंत्रीपद हा विषयच आमच्यापुढे नाही. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार अशी खूप मोठी आव्हानं सध्या राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात गुंतवणूक आणणारं आणि आलेली गुंतवणूक इथेच राखून ठेवणारं असं पारदर्शक सरकार आम्ही देणार आहोत.”