नुकतंच स्टॅन्ड अप काॅमेडियन मुन्नवर फारुकी याने कोकणी लोकांबद्दल बोलताना वापरेल्या अपशब्दामुळे चागंलाच वाद रंगला होता. सोशल मीडियावरून त्याच्यावर प्रचंड टीका झाल्यानंतर त्याने अखेर माफी मागितली. हा एक वाद संपत नाही तोच मालवणी भाषेवरून नवा वाद सुरू झाला आहे, आणि तोही थेट (Big Boss Marathi) बिग बाॅस मराठीच्या घरातून. नेमकं प्रकरण काय आहे? अरबाज, निक्की आणि वैभवर नेटकरी का संतापले? हे व्हिडीओमध्ये जाणून घेऊ या.