मु्ख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय खडाजंगी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे 17 ऑगस्ट रोजी आपल्या बँक खात्यात 3000 रुपये येणार असल्याने लाडक्या बहिणी देखील भावाच्या ओवाळणीची अपेक्षा ठेऊन आहेत. आतापर्यंत विरोधक ही योजना बंद होणार किंवा सरकार पैसे दिल्यावर परत काढूनही घेणार असं म्हणत होते पण आता हीच तंबी थेट सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिली आहे. पुण्यातील (Pune) एका कंपनीच्या भूसंपादन केसप्रकरणी सर्वोच्च न्यायलायाने सरकारला हा निर्वाणीचा इशारा दिला आहे. १९९५ मधील या खटल्यात २०२४ च्या लाडकी बहीण योजनेचा संदर्भ अचानक कुठून आला? सर्वोच्च न्यायालय खरोखरच लाडकी बहीण योजना बंद करणार आहे का याविषयी सविस्तर जाणून घेऊया.