१५ ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण तुम्हाला माहितीये का? भारताप्रमाणेच आणखी काही असे देश आहेत जे १५ ऑगस्टलाच स्वातंत्र्य दीन साजरा करतात. यंदा १५ ऑगस्ट रोजी आपण भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. भारताला जसे ब्रिटिशांपासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. तसेच जगात इतर देशांनाही याच दिवशी निरनिराळ्या वर्षी स्वातंत्र्य मिळालेले आहे. हे देश नेमके कोणते हे जाणून घेऊयात.