Independence Day 2024, Independence Day Celebration, Mahatma Gandhi: दीड शतकाहून अधिक काळ रक्तरंजित लढा दिल्यानंतर १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले. राजधानी दिल्लीत स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष साजरा केला जात होता. यामागचं नेमकं कारण काय हे आपण आजच्या व्हिडीओमधून जाणून घेणार आहोत. जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संसदेच्या संविधान सभेत ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ (नियतीशी करार) हे अजरामर भाषण दिले. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी द हिंदू या दैनिकात लिहिलेल्या लेखात दिलेल्या माहितीनुसार, याच वेळी महात्मा गांधी कलकत्ता (आताचे कोलकाता) येथे फाळणीमुळे उफाळलेला धार्मिक संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न करीत होते.