बारामती विधानसभा मतदार संघातून जय पवार यांनी लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडुन होत आहे. त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की,”शेवटी लोकशाही आहे. मला तरी निवडणूक लढण्यात रस नाही. मी तिथे सात-आठ वेळा निवडणुकीला उभा राहिलो आहे. जनतेचा कौल असेल त्याप्रमाणे आमच्या पक्षाचे संसदीय समिती त्याचा निर्णय घेईल. स्थानिक कार्यकर्ते आणि पक्ष संघटना जो निर्णय घेईल, तो आम्ही मान्य करू.”