उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी जनसन्मान यात्रा काढून विधानसभेसाठी प्रचाराचा नारळ फोडला आहे. अशात त्यांच्या कार, जॅकेट यांचा रंग गुलाबी आहे. त्याचं नेमकं कारण काय? हे दस्तुरखुद्द अजित पवार ( Ajit Pawar ) यांनीच सांगितलं आहे. ANI या वृत्तवाहिनीला अजित पवार यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी हे कारण स्पष्ट केलं आहे.