गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून धुसफुस सुरू असल्याची चर्चा आहे. खासदार संजय राऊत यांच्याकडून वारंवार मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं जात होतं. आज महाविकास आघाडीच्या मेळाव्यात स्वतः उद्धव ठाकरे यांनी याबाबत भाष्य करत महत्त्वाचं विधान केलं आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा, उद्धव ठाकरेंचा त्याला पाठिंबा असेल, असं ठाकरे म्हणाले.