लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी लवकरच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज (दि.१६ ऑगस्ट) दुपारी ३ वाजता दिल्लीमध्ये महत्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करणार आहे. पण यामध्ये जम्मू-कश्मीर, झारखंड, हरियाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे.
CI Live: The Election Commission of India will announce the schedule for assembly elections. The Election Commission will hold a press conference at 3 pm today.