लाडकी बहीण योजनेवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलाच वाद रंगल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार रवी राणा यांनी नुकतंच आगामी विधानसभा निवडणुकीत मतरुपी आशीर्वाद न दिल्यास, लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढून घेईन, असं विधान केलं होतं. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. आज महाविकास आघाडीच्या मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील याबाबत भाष्य केलं आहे. सगळ्या नाही, पण एका बहिणीचे पैसे परत घेऊन बघा, काय करायचं ते…असा सूचक इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.