महाराष्ट्र सरकार घाबरणारं सरकार आहे. यांना निवडणुकांची भीती वाटतेय. लोकसभेत महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना मोठा धक्का दिलाय. यांना आता ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्याचं धाडस होणार नाही, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. दरम्यान, आज निवडणुकीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे.