राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौर्यावर होते.त्यावेळी आज सकाळी रविवार पेठेतील एका ज्वेलर्स च्या दुकानाचे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास झाले.त्यानंतर तेथील उपस्थित नागरिकांनी माहेश्वरी समजाच्या श्रीराम मंदिरामध्ये दर्शनास यावे,असा आग्रह केला.त्यावर अजित पवार हे मंदिरात जाण्यास निघाले.त्यावेळी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अजित पवार यांना कचर्याचा ढीग दिसताच, एवढ भव्य दिव्य मंदिर असून येथील कचरा उचला नाही.कोणीही असल तरी साफसफाई ठेवली पाहिजे, अशा शब्दात अजित पवारांनी बाजूला असलेल्या विश्वस्तांना झापलं.तर त्यावर विश्वस्तांना काही उत्तर देता आले नाही.