जम्मू-काश्मीर आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत यासंदर्भातील माहिती दिली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं काय? यासंदर्भातील प्रश्नावरही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.