मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे राज्यभरात शांतता रॅली आणि सभा घेऊन भूमिका मांडत आहेत. तर २९तारखेपर्यंत राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.मात्र त्या दरम्यान राज्यातील मराठा बांधव ठिकठिकाणी राज्यकर्त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन मराठा आरक्षणाच्या बाबतीत भूमिका काय? असा जाब विचारत आहे.त्याच दरम्यान पुण्यातील बालेवाडी येथे उद्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ होणार आहे.त्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघात शिवसेनेच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.पण त्यावेळी पुणे शहरातील मराठा बांधव पत्रकार परिषदेच्या ठिकाणी येऊन घोषणाबाजी केली. तसंच आरक्षणाच्या बाबतीत शिवसेनेची भूमिका काय असा जाब नीलम गोऱ्हे यांना विचारला.