छत्रपती संभाजी राजे यांनी तिसऱ्या आघाडीची चाचपणी सुरू केली आहे. स्वराज्य पक्ष विधानसभा लढण्याच्या तयारीत आहे. त्याच वेळी मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर याबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे युती आणि आघाडीला राज्यात पर्याय मिळेल अशी रणनिती संभाजी राजेंनी आखली आहे.