राष्ट्रवादी काँग्रेसचा जन सन्मान यात्रेचा कार्यक्रम आज आळंदीमध्ये पार पडला. या कार्यक्रमात अजित पवार यांनी महिलांना लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती दिली. “लाडकी बहीण योजनेचे पैसे स्वत:साठी खर्च करा. तुम्ही कारभाऱ्याला पैसे देतात त्याचं भलं करतात पण तुम्हालाही जगण्याचा अधिकार आहे. तुम्हाला सक्षम करण्यासाठी ही योजना आहे.”, असं अजित पवार कार्यक्रमात म्हणाले.